
2022-04-04T17:23:46
4 C's कौन्सिलिंग सेंटर, पुणे व भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने -- *REBT Workshop* *विवेकी जीवनाची कार्यशाळा* दैनंदिन जीवनात आपण अनेक आव्हानांना सामोरे जात असतो. या आव्हानांना सामोरे जात असताना काही वेळेस आपले भावनिक स्वास्थ गमावून बसतो. आपल्याच आयुष्यात असं का? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. या सर्वांची उत्तरे शोधून आपले मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी उपयोगी पडते ती "REBT" म्हणजेच *Rational Emotive Behavioural Therapy म्हणजेच विवेकनिष्ठ विचारसरणी! ही वैचारिक जीवनशैली शिकवणारी कार्यशाळा आपण आयोजित करीत आहोत. आरोग्यदायी भावनांची जोपासना तुम्ही कशी करायची हे या कार्यशाळेत सांगितले जाईल. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी संशोधन केलेल्या या मानसोपचार प्रणालीद्वारे स्वतःच्या कामाचं, गुणविशेषांचं मूल्यमापन कसे करायचे, स्वतःचा स्वीकार कसा करायचा, भावनांचं समायोजन कसं करायचं आणि नवीन अंतर्दृष्टी देऊन मन:स्वास्थ्य कसे टिकवायचे हे शिकविले जाईल. REBT तुम्हाला स्वतः साठी तर उपयोगी आहेच, परंतु त्याचबरोबर या समुपदेशन थेरपीद्वारे आपले समुपदेशन कौशल्य वाढवता येईल. *कार्यशाळेत कोण सहभागी होऊ शकते?* ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे , आत्मविकासाची इच्छा असणारी व त्यासाठी प्रयत्न करू पाहणारी कोणतीही व्यक्ती कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. त्यासाठी वयाची अट नाही. *कार्यशाळेची रूपरेषा-* *तारीख* - 15 व 16 एप्रिल 2022 *वेळ* - स. 10.00 ते दु. 5.00 (दोन्ही दिवस) *शुल्क* - 1) 4 C's वैवाहिक समुपदेशन कोर्स केलेल्यांसाठी -- रु. 1500/- 2) इतर सर्वांसाठी -- रु. 2000/- *स्थळ* - न्यू लॉ कॉलेज , भारती विद्यापीठ एरंडवणे, मोरे विद्यालयासमोर, पौड रोड, कोथरूड, पुणे *मार्गदर्शक* : मानसोपचार, समुपदेशन क्षेत्रातील अनुभवी तज्ञ. *टीप* -- पुण्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शुल्कात हॉस्टेलची सोय करण्यात येईल. *कार्यशाळेसाठी नाव नोंदणी* -- आपले नाव व ई-मेल WhatsApp करावे -- 9552586584 *नोंदणीची अंतिम तारीख* -- 12/04/2022